डावा न मी अथवा उजवा न मी
पण कुंपणावरला फसवा न मी
डोळ्यांतले अश्रू पुसुनी पुनः
दुनियेस का म्हणतो हळवा न मी?
अंधारल्या वाटा चुकल्या तरी
कळते दिशा पुढची - चकवा न मी!
घे रंग तू माझे सगळे तुला!
हिरवा न मी अथवा भगवा न मी
मी बोललो दिसले जे सत्य ते
तू जाण हे इतके - कडवा न मी
अंतिम जरी असले संस्कार हे -
जग 'कोण मी?' पुसते, 'कितवा' न मी...
- - कुमार जावडेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा