Monday 27 April 2020

कसे जगाला खरे म्हणावे

कसे जगाला खरे म्हणावे?
जुने जमाने बरे म्हणावे!

सदैव असती मिटून दारे...
कसे घरांना घरे म्हणावे?

जिथे-तिथे मुखवटेच येथे
उगाच का चेहरे म्हणावे?

क्षणोक्षणी भांडतात त्यांना
कसे तुझी लेकरे म्हणावे?

टिपून दाणे उडून जाती...
मुलांसही पाखरे म्हणावे!

- कुमार जावडेकर

No comments:

Post a Comment