गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

पुन्हा

तुला गीत माझे कळू लागले
पुन्हा सूर सारे जुळू लागले

कसे सांग टाळू तुला पाहणे?
(तुझे केस गाली रुळू लागले....)

मनाला कुठे लाभली शांतता?
- जरी चार पैसे मिळू लागले...

जरा मुक्त करता जुनी बंधने
नवे पाश ते आवळू लागले

तुला, जीवना, थोपवू मी कसे?
कडे आज हे कोसळू लागले…

- कुमार जावडेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा