मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

भ्रमंती

क्षणात  येथे, क्षणात तेथे फिरून येशी
मना भ्रमंती कुठे कुठे तू करून येशी?

छतातुनी या सदा बरसती तुझेच अश्रू
उरी प्रलय तू कशास इतका भरून येशी?

'सुरू करूया पुन: नव्याने' म्हणून का तू
जुने बहाणे पुनः नव्याने स्मरून येशी! 

घडून येतो जरा दुरावा जसा मनाला
कलीप्रमाणे मनात माझ्या शिरून येशी...

सभोवताली इथे नशीली प्रलोभने अन् 
'कुमार'-वय तू उगा मनी का धरून येशी?

- कुमार जावडेकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा