रविवार, ३० जुलै, २०१७

बांध

बांध हा फुटण्यास थोडा समय आहे
आणि मागे जीवनाचा प्रलय आहे

बोलणे खोटे तुझे हे जाणतो मी
चेहरे मज वाचण्याची सवय आहे

सांग आता मी खरे बोलू कुणाशी
झूठ येथे बोलण्याला अभय आहे

'शहर हे बदलून टाकू' ते म्हणाले
बोललो त्यांना 'जुना हा विषय आहे'

मांडतो शब्दांत मी दुःखे जगाची
भोवती माझ्या सुरांचे वलय आहे

- कुमार जावडेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा