भेट जेव्हा तुझी घडेल पुन्हा
जीवनी अर्थ सापडेल पुन्हा
(चांदण्याची नशा जडेल पुन्हा
लाजरा चंद्र सापडेल पुन्हा!)
पाहुनी चेहरा तुझा रात्री
चंद्र झाडांमधे दडेल पुन्हा
जीवना हा तुझा दुरावा पण -
जीवनी अर्थ सापडेल पुन्हा
(चांदण्याची नशा जडेल पुन्हा
लाजरा चंद्र सापडेल पुन्हा!)
पाहुनी चेहरा तुझा रात्री
चंद्र झाडांमधे दडेल पुन्हा
जीवना हा तुझा दुरावा पण -
आज त्याचा लळा जडेल पुन्हा
दूर जाशील तू पुन्हा आता
घास माझा इथे अडेल पुन्हा
जोवरी ओढ अंतरी आहे
भिंत दोघांतली पडेल पुन्हा...
- कुमार जावडेकर
दूर जाशील तू पुन्हा आता
घास माझा इथे अडेल पुन्हा
जोवरी ओढ अंतरी आहे
भिंत दोघांतली पडेल पुन्हा...
- कुमार जावडेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा