Monday 27 April 2020

चंद्रमौळी

दूर गावी जायचे होते
शहर हे विसरायचे होते

माळरानी कोरड्या तिथल्या
जीवना रुजवायचे होते

पाखरांच्या कूजनासंगे
मुक्त थोडे गायचे होते...

चंद्रमौळी छप्परांमधल्यां
चांदण्याने न्हायचे होते

फक्त वणवे पेटती तेथे
दीप हे उजळायचे होते

पावलांचा घेत मागोवा
मी तुला शोधायचे होते

- कुमार जावडेकर

No comments:

Post a Comment