श्वास मीही घेत होतो सारखा...
दूर मृत्यू नेत होतो सारखा...
वृत्त कळता तेच आले धावुनी
दोष ज्यांना देत होतो सारखा
तू न येथे माहिती आहे तरी
दूर मृत्यू नेत होतो सारखा...
वृत्त कळता तेच आले धावुनी
दोष ज्यांना देत होतो सारखा
तू न येथे माहिती आहे तरी
का तुझा संकेत होतो सारखा?
भेट घेण्या पोचुनी दारी तुझ्या
रद्द माझा बेत होतो सारखा...
माहिती माझा कुणाला चेहरा?
थांबलो छायेत होतो सारखा...
एक तोही पूल आता मोडला
ज्यावरी मी येत होतो सारखा
- कुमार जावडेकर
थांबलो छायेत होतो सारखा...
एक तोही पूल आता मोडला
ज्यावरी मी येत होतो सारखा
- कुमार जावडेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा