गातील पक्षी इथली कहाणी...
तू थांब येथे स्फुरतील गाणी!
(का देत जाता वचने पुराणी
झालीच आहे जनता शहाणी!)
मी दुःख सांगू इथल्या कुणाला
डोळ्यांत आहे सगळ्यांच पाणी...
हे वेड कसले जडले मनाला?
तू ज्या ठिकाणी, मन त्या ठिकाणी
पाहू कशाला प्रतिबिंब माझे
शब्दांत माझी उमटे निशाणी
माझे मलाही कळलेच नाही
का होत गेली दुनिया दिवाणी?
- कुमार जावडेकर
तू थांब येथे स्फुरतील गाणी!
(का देत जाता वचने पुराणी
झालीच आहे जनता शहाणी!)
मी दुःख सांगू इथल्या कुणाला
डोळ्यांत आहे सगळ्यांच पाणी...
हे वेड कसले जडले मनाला?
तू ज्या ठिकाणी, मन त्या ठिकाणी
पाहू कशाला प्रतिबिंब माझे
शब्दांत माझी उमटे निशाणी
माझे मलाही कळलेच नाही
का होत गेली दुनिया दिवाणी?
- कुमार जावडेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा