सोमवार, २७ एप्रिल, २०२०

विहिरी, तलाव, गावे

विहिरी, तलाव, गावे पडतील ओस आता
पाठीस घे घराला चल कोस-कोस आता

प्रत्येक वर्ष आले घेऊन ही अपेक्षा
कोणी उपाय येथे करतील ठोस आता...

ज्यांच्याकडून तेव्हा आश्वासने मिळाली
फिरतात मोकळे का ते राजरोस आता?

ही मूक पाखरेही जाती स्थलांतराला
तू सोड बंधनांचा हा व्यर्थ सोस आता

जाईल हा उन्हाळा येईल पावसाळा
ही रीत या जगाची विसरू नकोस आता

- कुमार जावडेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा