न कळले कुणाला, माझ्या मनातले
उघड(!) हासण्याला फसले भले-भले!
मिटव मीलनाच्या तू सागरा खुणा
उमटलीत माझी वाळूत पावले...
कवडसा उन्हाचा देऊ नकोस तू
गडद सावल्यांना डोळे सरावले...
परत अंगणी या येतील पाखरे
उचलुनी स्मृतींचे चोचींत शिंपले!
'अलग मार्ग अपुले,' म्हटलेस तू, तरी
कुशल का विचारू मी तोंडदेखले?
बदलते जगाचे पाहून चेहरे
सतत शोधतो मी अस्तित्व आपले...
- कुमार जावडेकर
उघड(!) हासण्याला फसले भले-भले!
मिटव मीलनाच्या तू सागरा खुणा
उमटलीत माझी वाळूत पावले...
कवडसा उन्हाचा देऊ नकोस तू
गडद सावल्यांना डोळे सरावले...
परत अंगणी या येतील पाखरे
उचलुनी स्मृतींचे चोचींत शिंपले!
'अलग मार्ग अपुले,' म्हटलेस तू, तरी
कुशल का विचारू मी तोंडदेखले?
बदलते जगाचे पाहून चेहरे
सतत शोधतो मी अस्तित्व आपले...
- कुमार जावडेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा