सोमवार, २७ एप्रिल, २०२०

मराठमोळी

नकोत परक्या अनेक ओळी...
गझल असावी मराठमोळी!

हसून घेते हळूच चिमटे...
दिसेल जनता वरून भोळी!

तुझ्या मनीचे रहस्य दिसते
तुला न कळता - तुझ्याच डोळी...

नकाच उमलू पुन्हा कळ्यांनो,
क्षणात येथे सुटेल गोळी...

फकीर आम्ही! जगास देण्या -
भरू सुखांनी अखंड झोळी!

- कुमार जावडेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा