सोमवार, २७ एप्रिल, २०२०

कोण तू

सांग आहेस कोण तू, कुठला?
जाणतो मी खरे, न तू इथला...

सर्व ही लेकरे तुझीच तरी
आप-परभाव त्यांत हा कसला?

राहिले कोण भोगण्यास सजा?
चालला दीर्घकाळ तो खटला!

सुफल झाले अनेक स्वार्थ इथे
मात्र उरली न ही धरा सुजला...

काळ नेलास दूर दूर पुढे
जीवना घेतलास का बदला?

- कुमार जावडेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा