Thursday 23 August 2018

भोवरे

मी दूर होतो हे खरे
पण वाचले मी चेहरे

निद्रिस्त का झाली घरे
करुनी नभांची छप्परे

घरट्यात ना उरले कुणी
गेली, उडाली पाखरे

मी उघडली दारे तरी
पक्ष्यांस प्रिय हे पिंजरे

टिकणार का होती कधी
वाळूतली ही अक्षरे

वाहून ने तू जीवना
हे खूप झाले भोवरे…

- कुमार जावडेकर 

No comments:

Post a Comment