सोमवार, २७ एप्रिल, २०२०

टिळा (हझल)

ठोकला भिंतीत मी मोठा खिळा...
लावली माझी छबी, अन् वर टिळा!

राम का येईल या जागी पुन्हा?
माणसे झाली बघा येथे शिळा...

यंत्र पैसे देत जाऊ लागले!
फक्त म्हणता 'उघड दरवाजा तिळा'...

काम त्यांनाही कधी नसतेच का?
गात बसती सारख्या या कोकिळा

भोपळा मी होत जातो नेहमी
आणि सुखही नेहमी होते विळा!

- कुमार जावडेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा