सोमवार, २७ एप्रिल, २०२०

समुदाय

समुदाय माणसांचा आहे अथांग येथे
सर्वत्र तू तरीही करतात रांग येथे

नावे तुझ्याच देवा व्यापार मांडती, वा-
भडकावण्यास कोणी देतात बांग येथे

माझ्या मनास मीही चोरून मुक्त केले
रूढी-परंपरांचे का स्तोम सांग येथे?

सारेच देवभोळे - पूजा, उपास करती
तेही सणासुदीला घेतात भांग येथे!

दुःखास सोसुनीया जे मूक झोपले ते
उठता सवाल उठले का उटपटांग येथे?

तू देत राहशी अन् मी घेत राहतो ते
वाटून सर्व लोकां फेडीन पांग येथे

- कुमार जावडेकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा