पाऊस कोसळू दे...मृद्गंध दरवळू दे...थेंबांसवे मनालाआता उचंबळू देविरहात चांदण्याच्यापुरते मला जळू देडोळ्यांमधील पाणीहलकेच ओघळू दे...पाहून हास्य माझेदुःखास हळहळू दे
आहेस कोण तू, हेआता मला कळू दे!- कुमार जावडेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा